navratne

navratne

Sunday, July 10, 2016

आपल्याला कोणते रत्न लाभते हे केवळ राशीवरून ना ठरवता एकदा ज्योतिषास कुंडली दाखवून पाहून घेतले , की मग प्रश्न राहतो तो रत्न निवडण्याचा . आता सर्वात महत्वाचा मुद्दा जरी प्रत्येकाला किती किमतीपर्यंत रत्न घ्यायचे आहे हे जरी त्या व्यक्तीला माहित असते तरी काही रत्ने उदाहरणार्थ पुष्कराज किंवा पाचू आणि सर्वात जास्त हिरा ही अत्यंत महाग असतात . त्यामानाने मोती, पोवळे, लसण्या ,गोमेद हे स्वस्त असतात .म्हणजे जर एखाद्याने ठरवले की मी 5००० रुपयामध्ये रत्न घेणार आहे .तर त्या किमतीत पुष्कराज किंवा पाचू ,नीलम हे हलक्या प्रतीचे मिळतील पण मोती पोवळे किंवा गोमेद उत्तम दर्जाचे मिळू शकतील .
आता महत्वाचे ५ मुद्दे.
 १) colour  २) carat ३) cut ४) clarity ५) origin
१) रंग - प्रत्येक रत्नाचा  जो काही ठरलेला रंग असेल त्या रंगांत त्या रत्नाचा रंग गहिरा असावा उदा माणिक  ,पाचू  . परंतु पुष्कराज मध्ये मात्र सिलोनच्या खाणीतले पुष्कराज अतिशय उत्तम दर्जाचे असूनही रंगाने पांढरट पिवळसर असतात.
२) वजन - म्हणजे कॅरट .एका ग्रॅम मध्ये ५ कॅरट बसतात . म्हणजेच १ कॅरट म्हणजे ०.२ ग्रॅम . यामध्ये आपल्या अडचणीच्या तीव्रतेनुसार कॅरट ठरवले जाते .
३) कट - प्रत्येक रत्न कोणत्या  आकारात ,  कशा प्रकारे , किती प्रकारे,  आणि कसे कट केले आहे यावर त्या रत्नाची किंमत असते .
४) पारदर्शकता - उत्तम प्रतीचे रत्न चांगल्यापैकी स्वच्छ असते .त्यामध्ये सूर्यप्रकाशात पाहिल्यास आत मध्ये जाळी किंवा रेषा दिसत नाहीत .पण अशी रत्ने कित्येक हजार रुपये प्रती कॅरट असतात .
५) उद्गम- प्रत्येक रत्न कोणत्या खाणीतून निघाले आहे. या वर बरेचदा त्या रत्नाचा दर्जा अवलंबून असतो .उदाहरणार्थ   bankok , columbia , cylon अशा विविध ठिकाणी आणि विविध प्रकारच्या खाणी आहेत . तसेच काही खाणींची विशेषता तिथे गडद किंवा हलक्या रंगांची रत्ने सापडतात  यावर असते
आता या सर्वांची माहिती घेतल्यावर लक्षात येते की अतिशय उत्तम पारदर्शकता असलेले अंदाजे ३ कॅरट चे रत्न जर एखाद्या दुकानात आपल्याला ३००० ते ५००० मध्ये देत असतील तर नक्कीच तिथे फसवणूक होण्याची शक्यता आहे .कारण खरे रत्न इतक्या स्वस्त किमतीत मिळू शकणार नाही .म्हणजे हे खऱ्या रत्नाप्रमाणे दिसणारे उपरत्न असले पाहिजे .जी जवळ पास ८४ प्रकारात येतात .आणि त्यांची किंमत ही ३०० रुपयांपासून ते 21००  पर्यंत असू शकते .खरा उत्तम प्रतीचा पुष्कराज ५००००  ला तर त्यासारखेच दिसणारे टोपाज हे रत्न केवळ 1000  रुपयास मिळू शकते  .मध्यम वर्गीयांना परवडणाऱ्या रत्नात मात्र जाळी किंवा रेषा दिसणे आवश्यक ठरते .कारण तीच त्यांच्या खरेपणाची  खूण ठरते.

सोनाली लिखितकर
नक्षत्र ज्योतिष, पुणे
व्हाट्स अप 9890447025

Sunday, February 9, 2014

शनीच्या साडेसातीचा फेरा---

शनीच्या साडेसातीचा फेरा---
सतत अडचणी येऊ लागल्या ,की नकळत आपल्या तोंडातून  निघते की काय साडेसाती लागलीय .... कधी संपणार कोणास ठाऊक... ?????? कोणाच्या कुंडलीत खरोखरच साडेसाती सुरु असेल किंवा येणार असेल तर तो माणूस खूपच भेदरलेला असतो  की काय होणार काय माहित ...आजचा लेख लिहिण्याचे मूळ उद्दिष्ट हेच आहे की साडेसाती म्हणजे काय आणि तिला घाबरांयचे खरोखर कारण आहे का? ....
आकाशामध्ये जे १२ प्रकारचे तारकासमूह आहेत त्यांना राशी म्हणतात .
१)मेष ,२) वृषभ,३)मिथुन ,४)कर्क ,५) सिंह , ६)कन्या ,७) तूळ , ८)वृश्चिक ,९)धनु ,१०) मकर ,११)कुंभ,१२) मीन   
 त्यामध्ये जेव्हा शनी या १२ राशी पैकी एखाद्या विशिष्ट राशीतून भ्रमण करतो तेव्हा  , त्या राशीच्या आधीच्या राशीला  , त्या विशिष्ट राशीला आणि नंतरच्या राशीला  साडेसाती आहे असे म्हणले जाते .म्हणजेच उदाहरणार्थ शनी सध्या तूळ राशीत आहे म्हणुन तूळ  राशीला ,तिच्या मागच्या  कन्या  राशीला आणि  पुढच्या वृश्चिक  राशीला साडेसाती आहे .
 आता या साडेसातीला घाबरण्याचे कारण म्हणजे शनी जेव्हा आपल्या राशीत ,किंवा आपल्या राशीच्या जवळच्या राशीत येतो तेव्हा आपल्याला बऱ्याच अडचणी उत्पन्न  होतात .याचे कारण समजून घ्यायचे म्हणले तर आपल्याला शनी ग्रहाचे गुणधर्म लक्षात घेतले पाहिजेत .हा ग्रह अतिशय संथ ,सावकाश आहे . एकलकोंडा ,सत्य प्रिय आणि प्रत्येक व्यक्तीला, त्या व्यक्तीची स्वतःची जागा दाखवून देणारा ग्रह आहे .म्हणूनच ज्या व्यक्तीचे पाय जमिनीवरच आहेत तिला या साडेसातीचा विशेष त्रास होत नाही .पण स्वतःच्याच धुंदीत असणाऱ्या ,काम क्रोध ,लोभ ,मोहात अडकलेल्या व्यक्तीला या साडेसातीचा अतिशय त्रास होतो .आता नीट विचार केलात ,की जर एखादी व्यक्ती स्वतःला अतिशय भारी समजते . तिला स्वतःशिवाय बाकीचे जग कस्पटासमान वाटते . पैशाशिवाय दुसरी गोष्ट सुचत नाही . घरात सासू सासरे  ,नणंद  यांना पाण्यात पहाते. किंवा नोकरीच्या ठिकाणी घाणेरडे राजकारण करते . लाचखोरी करते . स्वतःशिवाय दुसऱ्या कोणालाही मदत करत नाही .तर मग अशा व्यक्तीला शनी महाराज स्वतःचा झटका दाखवल्याशिवाय राहत नाहीत . मग पूर्णपणे तावून सुलाखून बाहेर काढायचा प्रयत्न ,शनिदेव करतात .आता त्या साडेसातीलाही ना जुमानता पुन्हा ये रे माझ्या मागल्या .अशा प्रकारे पुन्हा सर्व विसरून पुन्हा वाईट मार्गाने जाणारे कमी लोकं नाहीत .पण या साडे सातीचा धडा घेऊन त्यातून माणूस स्वतःला चांगला घडवायचा प्रयत्न करेल तर ती खरी परीक्षा .आता साडेसातीचे उपाय  पुढील लेखात ... 
ज्योतिषी  सौ  सोनाली लिखितकर

Thursday, February 10, 2011

भविष्य पाहता पाहता

भविष्य पाहता पाहता
खरच हे ज्योतिष शास्त्र शिकले आणि गेल्या १५ वर्षात माझे जीवन एकाहून एक अनुभवांनी समृद्ध झाले.चांगले आणि वाईट  दोन्हीही. अगदी ४,५ दिवसापूर्वी ची गोष्ट. सकाळची गडबडीची कामे नुकतीच आटोपली होती .जरा टेकावे असा विचार करत असतनाच  फोन आला .पलीकडून एक मुलगी बोलत होती ,"ताई तुम्ही भविष्य पाहता न. " "हो " मी उत्तरले ."ती म्हणाली ,"मला जॉब कधी मिळेल आणि राहायला जागा कधी मिळेल हो?"
राहायला जागा ? म्हणजे ? .तू राहतेस कुठे ग ? एवढे मी विचारल्यावर तिचा आवाज दाटून आला आणि फोनवरच ती रडू लागली .तिची कहाणी मला सांगू लागली .ताई , आता मी ७,८ महिन्यांच्या कैदेतूनच बाहेर पडलीय .माझे वर्षभरापूर्वी लग्न झाले ,प्रेम विवाह ......... पण माझा नवरा चांगला निघाला नाही .तो रोज दारू पिऊन मला मारत असे .  माझ्या सासरच्या  लोकांनी मला घरात डांबले होते .घरातील सर्व कामवाल्या कढून टाकल्या आणि माझ्याकडून कामे करून घेत असत .दिवसरात्र सासू सासरे मला टोचून बोलत आणि काल तर कहर झाला सासूने नवऱ्याला सांगितले हिच्या डोळ्यात तिखट टाक. फार मस्ती आहे हिच्या अंगात .पण मी कशीतरी माझ्या रूमची कधी लावून आत बसले .आणि आज हळूच कुणालाही न कळू देता थोडे फार कपडे आणि पैसे बरोबर घेऊन घरातून पळाले. आज मी ७, ८ महिन्यांनी ऊन पहात आहे .मला काही समजत नाही मी काय करावे. ?
"अग पण मग तुझ्या आई वडिलांना फोन कर ."
ताई मला वडील नाहीत .आईला अर्धांग वायू झालाय. माझ वय आता ३५ वर्ष आहे .एवढी वर्षे मी नोकरी केली आणि भावाचा संसार सांभाळला कारण तो जास्त शिकला नाही .त्याला नीट नोकरी पण मिळत नाही. म्हणून एवढी वर्ष पासे पुरवले त्याला .म्हणून मी जेव्हा लग्न केले तेव्हा त्याने मला खूप त्रास दिला आणि सांगितले तू आता माझ्या घरी पाऊल टाकू नको .आणि आता त्याला मी सांगितले फोन करून ,तेव्हा तो म्हणाला तू कुठेही जा ,मी तुला घरात घेणार नाही .आणि त्याने नवीन ठिकाणी घर बदलले त्याचा पत्ताही मला देत नाही .मी काय करू हो ताई ?
माझे ही डोळे ओलावले ."अग तू काही खाल्लस की नाही ? "
माझ्या या प्रश्नावर ती ओक्सा बोक्शी रडू लागली .कसे तरी तिला शांत केले .
ताई माझी मदत करा हो .,मी तिला म्हणले हे बघ ,तू थोडे काही तरी खावून घे .तुला २,३ ठिकाणाची माहिती  सांगते तिथे राहण्याची व्यवस्था होऊ शकेल .मग मी तिला एका माहित असलेल्या मंदिराची माहिती दिली जिथे सेवा केल्यास रहायची व्यवस्था होते . मी तुला या नंबरवर थोड्या वेळाने फोन करते .माझ्या एवढ्या बोलण्यानेही तिला बरे वाटले .
तेवढ्यात माझ्या सासू बाईनी  मला हाक मारली ,अग जेवायला घेऊ या का ? भूक लागली नाही का ? त्यांना होकार दिला .पानावर बसले त्यांच्या समाधानाकरिता ........पण घास घशाखाली उतरेना .ती कशी असेल ? ज्या मुलीला कोणताही आसरा नाही त्यांची काय अवस्था असेल ? ती काही जेवली असेल का? ............माझी तब्बेत ठीक वाटत नाही म्हणून मला जास्त जेवायचे नाही असे म्हणून मी कसे तरी ४ घास खाल्ले .पण ती डोक्यातून जाईना. मग पुन्हा काही वेळाने मी तिला फोन केला . ती म्हणाली ताई तुम्ही माझे भविष्य पहा ना .माझी जन्मतारीख ही आहे .असे सर्व सांगून म्हणाली .तुमची फी किती ? मी म्हणले अग तूझी नीट व्यवस्था झाली की सांग  ,तीच माझी फी ............ 
मग काही वेळातच फोन करून तिला मी माझा सल्ला आणि भविष्यावरून भाकीत सांगितले.. तिच्या आयुष्यात खरो खर काही विवाहाचे  सुख नव्हतेच .......पण तिला नोकरी मात्र चांगली लागणार होती .निदान हा तरी बरा भाग  होता .
काय आहे माणसाची माणुसकी  या जगात  ........सख्या बहिणीला घरात ना घेणारी...........तिच्या पैशाचा उपयोग करून स्वतः मजा करणारी ............. स्वतःच्या सुनेच्या डोळ्यात तिखट टाकायला सांगणारी .............. या पेक्षा प्राणी बरे ..............क्षुद्र कीटक बरे .........सर्वच माणसे वाईट नसतात पण जेव्हा अशी माणसे पाहतो तेव्हा माणुसकीला काळिमा फासला जातो ...............
 

Monday, January 31, 2011

नीलमचे भय





नीलमचे भय
१४ जानेवारी किंवा १५ जानेवारीला रवी म्हणजेच सूर्य मकर राशीत प्रवेश करतो .आणि त्यानंतर १५ फेब्रुवारीस सूर्य कुंभ राशीत प्रवेश करतो .हे सूर्याचे मकर आणि कुंभ राशीतील भ्रमण म्हणजेच शनीच्या स्वतःच्या राशीतून भ्रमण असते शनी हा ग्रह माणसाला त्याची स्वतःची जागा दाखवून देतो .आणि त्याच बरोबर चांगल्या वाईट काळात आपल्याला आपली माणसे आणि इतर माणसांमधला फरक dakhvi.हा काळ शनीचे रत्न धारण करण्यास उपयुक्त काळ आहे .शनीचे रत्न नीलम आहे.
 

परंतु हे काहीसे प्रभावी रत्न हे .या विषयी खूप गैर  समज आढळतात . हे रत्न चांगला किंवा वाईट परिणाम लवकर दाखवते .म्हणून हेअंगठीत  घालण्या अगोदर १५ दिवस त्याची जवळ ठेवून परीक्षा घेतात .परंतु जर हे रत्न घालण्या अगोदर जर नीट पत्रिका दाखवून ते लाभते की नाही हे आधीच पाहीले तर घाबरण्याचे कारण नाही .मी स्वतः ज्या लोकांना आतापर्यंत हे रत्न सुचवले आहे त्यापैकी कुणालाही या रत्नाचे वाईट फल मिळाले नाही. शनी या ग्रहाचे जामुनिया, लाजावर्त आणि  amathist ही उपरत्ने आहेत .

ही रत्ने त्या मानाने कमी प्रभावी असतात .पण सुरक्षित असतात .त्यामुळे सहज वापरता येतात.  

Friday, January 28, 2011

आज माझ्या ज्योतिष विषयक अनुभवांचे दालन आज तुमच्यापुढे खुले करावेसे वाटत आहे.  पण प्रथम आपल्याला ज्योतिषाची  थोडी माहिती असली पाहिजे. आपण जेव्हा ज्योतिषास जन्म वेळ ,तारीख आणि जन्माठीकन सांगतो .तेव्हा ज्योतिषी एक कुंडली तयार करतो .ही कुंडली  म्हणजे जन्माच्या वेळी आकाशात जी ग्रहस्थिती होती त्याचा नकाशा . म्हणून आज मी पहिल्या लेखात कुंडलीमध्ये जी १२ स्थाने असतात त्यांची माहिती सांगेन.

१) पहिले स्थान --लग्नस्थान
या स्थाना वरून माणसाचे आयुष्य ,रंग रूप ,स्वभाव , डोके ,मेंदू  या गोष्टी पहिल्या जातात.
२)दुसरे स्थान --धनस्थान
या वरून माणसाला मिळणारा पैसा ,त्याचे डोळे ,बोलणे ,कुटुंबातील व्यक्ती ,त्याशिवाय काही मारक बाधक गोष्टी पहिल्या जातात.
३)तिसरे स्थान -पराक्रम स्थान
या वरून माणसाने स्वतः मेहनतीने मिळवलेले यश ,छोटे प्रवास ,लहान भावंडे ,हात श्वसनसंस्था पहिली जातात.
४)चौथे  स्थान -सुख स्थान
या स्थानावरून गाडी ,बंगला ,मालमत्ता, आई ,माणसाचे मन ,जमीन या गोष्टी पाहतात.
५)पाचवे स्थान -संतती स्थान
नावाप्रमाणेच यावरून मुले बाळे, अंगात असलेल्या कला, विविध गोष्टींचे उत्पादन ,पाठीचा कणा या गोष्टी पाहतात
६) सहावे स्थान -रिपू स्थान
या स्थानावरून आपले शत्रू ,आजार ,रोग , पोट ,मामा ,पाळीव प्राणी कोर्टकेस इत्यादी गोष्टी पाहतात
७)सातवे स्थान --विवाह स्थान
हे जोडीदाराचे स्थान आहे ,जोडीदाराचे रंग रूप ,स्वभाव ,इत्यादी ,शिवाय व्यवसायातील पार्टनर पण यावरूनच बघतात.
८)आठवे स्थान -मृत्युस्थान
यावरून मृत्युच्या  वेळची परिस्थिती, गुप्तधन ,वारसाहक्काचे धन ,गुप्त गोष्टी पहिल्या जातात.
९)नववे स्थान -धर्मस्थान
या वरून दूरचे प्रवास ,यात्रा ,धार्मिक गोष्टी ,न्यायखाते, उपासना, पाय  या गोष्टी पाहतात.
१०)दहावे स्थान -कर्मस्थान
माणसाचा नोकरी धंदा ,पदोन्नती ,त्यातील यश गुडघे   ,या गोष्टी पाहतात .
११)अकरावे स्थान -- लाभ स्थान
या स्थानावरून वेगवेगळे लाभ ,मित्र परिवार , कान या गोष्टी पाहतात ,आपल्या सर्वांच्या कुंडलीत हे स्थान नक्कीच प्रबळ असावे म्हणून फेसबुक च्या माध्यमातून सर्वाना  एवढा  मोठा मित्र परिवार मिळाला .
१२) बारावे स्थान -व्यय स्थान
या वरून परदेशी जाणे ,हॉस्पिटल , जेल ,गुंतवणूक ,खर्च होणे   या गोष्टी पाहतात तसेच मोक्षा करिताही नवम व द्वादश या स्थानांचा एकत्रित विचार करतात

तर अशी ही १२ स्थाने .आपल्या आयुष्यातील विविध बाबींना स्पर्श करणारी ,आणि अजूनही आत आत खोल अर्थ दडलेली .आता

भाग्य रत्नाचे रहस्य

भाग्य रत्नाचे रहस्य

नमस्कार मित्र मैत्रीणीनो,
माझा पहिला भविष्यावरचा   लेख प्रसिद्ध केल्यावर खूप जणांच्या  मागणीवरून आज हा दुसरा लेख प्रसिद्ध  करत आहे. रत्ने आणि त्याचे उपयोग यावर........
संकटांमध्ये सापडल्यावर आणि दुसरे कोणते उपाय चालेनासे झाले की माणूस या रत्नांकडे वळतो . खरेतर पूर्वीच्या  काळी जशी आयुर्वेद चिकित्सा  होती त्याच प्रमाणे रत्न चिकित्सा पण केली जात असे . या मागचे कारण म्हणजे माणसाचे शरीर पंच महाभूतांचे बनले आहे. त्याच्या शरीरात जेव्हा एखाद्या गोष्टीची कमतरता होते ,म्हणजे ती कमतरता कधी शाररीक असते ,कधी पूर्व कर्मांमुळे असते .तर कधी पूर्व जन्मीच्या कर्मांमुळे असते. ही कमतरता काहीप्रमाणात भरून काढण्या साठी आपण औषधे किंवा रत्ने यांचा आधार  घेतो .
या रत्नांमधून मिळणारे   किरण हे शरीरावर फायदेशीर ठरतात आणि आपल्याला १ महिना ते ३ महिन्यात गुण दिसू लागतो .
ही रत्ने ९ ग्रहांची आहेत .त्यातील काही खनिज म्हणजे खाणीतून उत्पन्न होणारी तर काही जैविक म्हणजे प्राण्यांनी बनवलेली आहेत. पुष्कराज ,माणिक , नीलम ,हिरा , पाचू, लसण्या ,गोमेद ही रत्ने खाणीतून येतात तर पोवळे  आणि मोती हे समुद्रातले लहानसे जीव बनवतात .प्रत्येक ग्रहाचे एक मुख्य रत्न असते आणि काही उपरत्ने असतात. एकंदर ९ मुख्य रत्ने आणि ८४ उपरत्ने आहेत.पण आज आपण या ९ रत्नांचीच  माहिती प्रथम करून घेऊ या. एकंदर १२ राशी आहेत .
***आपल्या राशीप्रमाणे माणूस रत्ने वापरू शकतो पण जेव्हा काही समस्यांकरिता   रत्ने घालायची असतील तेव्हा ती जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेवूनच धारण करावी. ***आपल्याला याविषयी काही सल्ला हवा असल्यास किंवा रत्ने हवी असल्यास आपण sonalijoshi93@gmail .com या mail id वर  संपर्क करू शकता.
यातील प्रथम पाहू पुष्कराज

१) पुष्कराज(yellow  sapphire ) - हे 'गुरु' ग्रहाचे रत्न आहे .धनु आणि मीन राशीचे रत्न.
हे पिवळ्या किंवा पांढऱ्या रंग छटा  मध्ये मिळते.यामुळे व्यापार धंदा ,आरोग्य आणि वैवाहिक  जीवनात  फायदा होतो.



<Photo 1>


२)माणिक (ruby )-हे सूर्याचे रत्न आहे. सिंह राशीचे रत्न. लाल ,गुलाबी डाळिंबी रंगांत  मिळते.
संततीकारिता ,आयुष्यात  स्थिरता येण्यासाठी, तसेच अधिकार पद मिळण्यासाठी , तेज वाढण्यासाठी  उपयोगी आहे.



<Photo 2>


३)पाचू(emrald )- हे बुध ग्रहाचे रत्न आहे. हे हिरव्या रंगाचे असते. मिथुन आणि कन्या राशीचे रत्न.
बुद्धीची कामे करणाऱ्या लोकांना उपयुक्त आहे .मानसिक शांती आणि श्वास विकारांवर उपयोगी आहे.ज्यांना आपली संभाषण कला वाढवायची आहे त्यांनी अवश्य घालावा.



<Photo 3>


४)हिरा (diamond )अतिशय तेजस्वी आणि महाग मिळणारे हे रत्न आहे. शुक्र ग्रहाचे रत्न आहे. तुला आणि वृषभ राशीकरिता  उपयोगी आहे. सौंदर्य आणि कलेच्या उपासकांना उपयुक्त असते.



<Photo 4>


५)नीलम (blue sapphire )शनी ग्रहाचे रत्न आहे .नावाप्रमाणेच निळ्या रंगांत, कधी काळ्या किंवा आकाशी रंगातही असते .मकर आणि कुंभ राशीच्या लोकांना चालते.
हे रत्न लवकर प्रभाव दाखवते. म्हणूनच ते घालण्या आधी जाणकार ज्योतिषास विचारूनच घालावे.
शानिसाम्बंधित दोषांकरिता उपयोगी आहे.



<Photo 5>


६)मोती (pearl ) हे चंद्राचे रत्न आहे. कर्क राशीच्या लोकांना चालते.
मानसिक विकारांवर किंवा मनोबल वाढवण्यासाठी पण त्याच बरोबर संवेदनशील बनवते.



<Photo 6>


७)पोवळे (coral ) -हे मंगळ  ग्रहाचे रत्न आहे. केशरी किंवा लाल रंगांत ,कधी कधी पांढऱ्या रंगातही मिळते.
मन खंबीर करण्याकरिता ,डॉक्टर ,पोलीस इ. लोकांना उपयुक्त .तसेच लहान मुलांना दृष्ट लागू नये म्हणून घालतात.



<Photo 7>


८) गोमेद (heassonite )राहू ग्रहाचे रत्न विटकरी ,लालसर रंगांत येते.हे कोणत्याही एका विशिष्ट राशीकरिता वापरत नाहीत तर काही ग्रहांचा एकत्रित परिणाम साधणे, किंवा जादू टोणा, वशीकरण या सारख्या समस्यांवर उपाय म्हणून वापरले जाते.



<Photo 8>


९)लसण्या(cat 's eye )- हे केतू ग्रहाचे रत्न आहे .हे मांजराच्या डोळ्याप्रमाणे दिसते .राखाडी ,किंवा काळसर ,पांढऱ्या रंगांत येते .याला सुद्धा स्वतःची रास नाही .पण नजर लागणे ,गुप्त शत्रूपासून रक्षण ,वाईट स्वप्नांपासून रक्षण याकरिता उपयोगी आहे.


<Photo 9>


तर अशी ही भाग्यरत्ने
पण माझ्या मते केवळ राशीवरून ना घालता आपली पूर्ण पत्रिका ज्योतिषास दाखवूनच ती धारण करावीत. श्रद्धा आणि शास्त्र या दोन्हीच्या समन्वयानेच माणूस संकटांमध्ये  पार पडतो किंवा त्यामध्ये खचून जात नाही. प्रत्येक व्यक्तीने स्वतःचे आचरण चांगले ठेवले पाहिजे. केवळ छान छोकीच्या मागे ना लागता सत्य आणि सद विचार अंगी बाणवले पाहिजेत.  या जगात कोणतीही गोष्ट कधीच वाया जात नाही .चांगली केली तरी आणि वाईट केली तरी ...........Energy can neither be  created nor destroyed  .it just transformed in to another form of energy .हा physics मधला नियम नेहमी लक्षात ठेवावा तर जीवनाचे गूढ आपोआपच आपणास उलगडेल. आणि या जन्मी केलेली चांगली कामे, या सुद्धा आणि पुढच्या जीवनात  सुद्धा आपणास चांगली फळे देतील