navratne

navratne

Sunday, February 9, 2014

शनीच्या साडेसातीचा फेरा---

शनीच्या साडेसातीचा फेरा---
सतत अडचणी येऊ लागल्या ,की नकळत आपल्या तोंडातून  निघते की काय साडेसाती लागलीय .... कधी संपणार कोणास ठाऊक... ?????? कोणाच्या कुंडलीत खरोखरच साडेसाती सुरु असेल किंवा येणार असेल तर तो माणूस खूपच भेदरलेला असतो  की काय होणार काय माहित ...आजचा लेख लिहिण्याचे मूळ उद्दिष्ट हेच आहे की साडेसाती म्हणजे काय आणि तिला घाबरांयचे खरोखर कारण आहे का? ....
आकाशामध्ये जे १२ प्रकारचे तारकासमूह आहेत त्यांना राशी म्हणतात .
१)मेष ,२) वृषभ,३)मिथुन ,४)कर्क ,५) सिंह , ६)कन्या ,७) तूळ , ८)वृश्चिक ,९)धनु ,१०) मकर ,११)कुंभ,१२) मीन   
 त्यामध्ये जेव्हा शनी या १२ राशी पैकी एखाद्या विशिष्ट राशीतून भ्रमण करतो तेव्हा  , त्या राशीच्या आधीच्या राशीला  , त्या विशिष्ट राशीला आणि नंतरच्या राशीला  साडेसाती आहे असे म्हणले जाते .म्हणजेच उदाहरणार्थ शनी सध्या तूळ राशीत आहे म्हणुन तूळ  राशीला ,तिच्या मागच्या  कन्या  राशीला आणि  पुढच्या वृश्चिक  राशीला साडेसाती आहे .
 आता या साडेसातीला घाबरण्याचे कारण म्हणजे शनी जेव्हा आपल्या राशीत ,किंवा आपल्या राशीच्या जवळच्या राशीत येतो तेव्हा आपल्याला बऱ्याच अडचणी उत्पन्न  होतात .याचे कारण समजून घ्यायचे म्हणले तर आपल्याला शनी ग्रहाचे गुणधर्म लक्षात घेतले पाहिजेत .हा ग्रह अतिशय संथ ,सावकाश आहे . एकलकोंडा ,सत्य प्रिय आणि प्रत्येक व्यक्तीला, त्या व्यक्तीची स्वतःची जागा दाखवून देणारा ग्रह आहे .म्हणूनच ज्या व्यक्तीचे पाय जमिनीवरच आहेत तिला या साडेसातीचा विशेष त्रास होत नाही .पण स्वतःच्याच धुंदीत असणाऱ्या ,काम क्रोध ,लोभ ,मोहात अडकलेल्या व्यक्तीला या साडेसातीचा अतिशय त्रास होतो .आता नीट विचार केलात ,की जर एखादी व्यक्ती स्वतःला अतिशय भारी समजते . तिला स्वतःशिवाय बाकीचे जग कस्पटासमान वाटते . पैशाशिवाय दुसरी गोष्ट सुचत नाही . घरात सासू सासरे  ,नणंद  यांना पाण्यात पहाते. किंवा नोकरीच्या ठिकाणी घाणेरडे राजकारण करते . लाचखोरी करते . स्वतःशिवाय दुसऱ्या कोणालाही मदत करत नाही .तर मग अशा व्यक्तीला शनी महाराज स्वतःचा झटका दाखवल्याशिवाय राहत नाहीत . मग पूर्णपणे तावून सुलाखून बाहेर काढायचा प्रयत्न ,शनिदेव करतात .आता त्या साडेसातीलाही ना जुमानता पुन्हा ये रे माझ्या मागल्या .अशा प्रकारे पुन्हा सर्व विसरून पुन्हा वाईट मार्गाने जाणारे कमी लोकं नाहीत .पण या साडे सातीचा धडा घेऊन त्यातून माणूस स्वतःला चांगला घडवायचा प्रयत्न करेल तर ती खरी परीक्षा .आता साडेसातीचे उपाय  पुढील लेखात ... 
ज्योतिषी  सौ  सोनाली लिखितकर